मुंबई – राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी तर अतिवृष्टीच झाली आहे. परतीच्या पावसाचा हा दणका सहन होत नाही तोच आता आगामी दोन दिवस कडक उन्हाला तोंड द्यावे लागणार आहे. कारण, आज व उद्या (१८ व १९ ऑक्टोबर) राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे सहाजिकच कमाल तपमानात काहीशी वाढ होणार आहे. परिणामी, ऑक्टोबर हीटचा अनुभव नागरिकांना येणार आहे. गेले दोन दिवस पाऊस आणि ढगाळ हवामानाचा सामना केल्यानंतर आता वाढत्या उष्म्याला तोंड द्यावे लागणार आहे. तशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. राज्यात आज व उद्याच्या तापमानाचा अंदाज वर्तविणारा नकाशा असा