इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस व पावसाळ्याच्या शेवटी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होतात, यंदा देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरावरील खोल तथा कमी दाबाचे क्षेत्र काल रविवारी संध्याकाळी चक्रीवादळात रूपांतरित झाले असून आज सोमवारी ते बांगलादेश किनारपट्टीकडे सरकत आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.
या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला थायलंड ने असे (सितरंग) नाव दिले असून रविवारी सकाळीच त्याने वेग घेतला. आज सोमवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याने भारतीय किनारपट्ट्याना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या मंगळवारी सकाळी चक्रीवादळ बांगलादेशातील टिकोना बेट आणि सनद्वीप यांच्यामध्ये धडकू शकते.
मुंबई, पुणे शहरासह महाराष्ट्रातुन मान्सून परतीला गेल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केल्यामुळे येथून पुढे पडणारा पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा असेल. तसेच हवामान विभागाने जाहीर केलेल्या ताज्या माहिती प्रमाणे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिमाण होणार नाही. कारण हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातच राहणार ते भारतीय किनार पट्ट्यात धडकणार नाही असा अंदाज आहे. मात्र या भागात जोरदार पाऊस पडेल. प्रामुख्याने ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनार पट्टीवर या चक्रीवादळाचा प्रभाव पडू शकतो.
बंगालच्या उपसागरात दि.२२ रोजी सकाळीच त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले. दि. २३ रोजी त्याचा वेग तशी ११० किमी राहीला होता, त्यामुळे भारतीय किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात ५० वर्षात येणारे हे आजवरचे सुमारे १७० वे चक्रीवादळ आहे. सन २०२० पासून चक्रीवादळाची नावे ठेवली जात आहेत. यापूर्वी आसानी, तौक्ते अशा प्रकारची नावे या चक्रीवादळाला देण्यात आली होती. त्यात या वादळाला सीतरंग किंवा सित्रांग हे नाव हे नाव थायलंड या देशाने दिले असून थाई भाषेत याला त्सुनामी असा अर्थ होतो. हे चक्रीवादळ रविवार, दि.३० रोजी बांगलादेश किनार पट्टीवर धडकून त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे.
वास्तविक या चक्रीवादलाचा फारसा प्रभाव आपल्या देशात होणार नाही असा अंदाज असला तरीही ओडिशा, प. बंगाल किनारपट्टीला सावधानतेचा देण्यात आला आहे . सदर चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेटापासून ५८० किमी दक्षिणेकडे आणि बांगलादेशातील बारिसालपासून ७४० किमी दक्षिण-नैऋत्य दिशेने सरकत होते हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो.
तसेच पश्चिम बंगालच्या किनारी भागांत १०० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे. यापूर्वी अंदाज वर्तवला होता की, सोमवारी दक्षिण २४ परगणा आणि उत्तर २४ परगणा तसेच, पूर्व आणि पश्चिम मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोलकाता, हावडा आणि हुगळीत सोमवारी आणि मंगळवारी रिमझिम पाऊस कोसळू शकतो.
बंगालच्या उपसागरात सुमारे ६ महिन्यापूर्वी विकसित झालेल्या असनी चक्रीवादळाचा पाठलाग सित्रांग चक्रीवादळ करणार असून यंदाचे हे दुसरे चक्रीवादळ आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासह उत्तर हिंद महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना आयएमडीने नावे दिली आहेत. बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या तेरा सदस्यांना IMD द्वारे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आणि वादळाचा इशारा दिला आहे.
आपल्या राज्यात यंदा प्रचंड बरसलेल्या मान्सूनच्या पावसाने रविवारी निरोप घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असून मान्सून परतल्याने आता दिवाळीत पाऊस पडणार आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातून देखील मान्सून परतला आहे. संपूर्ण राज्यात दि. २८ ऑक्टोबरपर्यन्त सर्वत्र कोरडे वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र मुसळधार पावसाने तर बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. तसेच, देशभरात यंदा तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे.
IMD Cyclone Alert States Deep Depression in Sea