मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळेच अनेक शहरात कमाल तापमानाने ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उन्हाची तीव्रता आणि उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागात येत्या आज आणि उद्या गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, राज्याच्या काही भागात पाऊस होण्याची चिन्हे आहेत. राज्याच्य ाकाही भागात काल पावसाने हजेरी लावली आहे. त्यापाठोपाठ आज आणि उद्या राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज दिवसभरात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा आहे. तर, उद्या म्हणजेच, बुधवारी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात अवकाळी पावासाचा अंदाज आहे. यासंदर्भात हवामान विभागाकडून दिल्या जाणाऱ्या माहितीकडे लक्ष ठेवावे, असेही सूचित करण्यात आले आहे.
Rainfall/thundershowers very likely over parts of Konkan and Madhya Maharashtra during next 4-5 days.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/RuRSxcxuhn— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 4, 2022