मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम येते पाच दिवस राज्यात होणार आहे. तशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. यापूर्वीच हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, आता बदलत्या परिस्थितीमुळे आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव, अकोला, बुलडाणा अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, ७ एप्रिल रोजी अहमदनगर, अकोला, जळगाव, ८ आणि ९ एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1511656551232458753?s=20&t=tM7K01-EWa5DvmACV04qzQ