इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळेच आज दिवसभरात त्याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट होण्याची चिन्हे आहेत. तशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. मुंबईतील हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे. नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1505462780190593025?s=20&t=WodmDNthh4Ki06f3IME6Vg