मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या हवामानात येते काही दिवस मोठा बदल होणार आहे. राज्यातील किमान आणि कमाल तपमानात तब्बल २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. विभागाने १० ते १३ डिसेंबर या काळातील हवामानाचा अंदाज दिला आहे. त्यानुसार, येते २ ते ३ दिवस मध्य महाराष्ट्रात किमान तपमान २ ते ४ अंश सेल्सिअसने घटणार आहे. तर, विदर्भात वीजांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, भंडारा या जिल्ह्यांना गारपीटीचा अलर्ट देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी हवामान विभागाने दिलेला खालील नकाशा बघा