अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कलाकार आपली कलाकारी विविध माध्यमातून नेहमी साकारत असतो. अशाच प्रकारे येवल्यातील संतोष राऊळ या कलाकाराने श्रावण महिनाचे निमित्ताने १००८ बेलाचे पाने आणून या सर्व बेलाच्या पानांना महादेवाचा आकार देऊन त्यावर कलर देऊन ध्यानस्थ महादेवाची अप्रतिम अशी प्रतिमा साकारली आहे. या मूर्तीच्या आजूबाजूला देखील शेकडो बेलाचे पाने लावून त्यावर देखील महादेवाच्या विविध प्रतिमा, ओम नमः शिवाय, डमरू, त्रिशूल असे सर्व महादेवाचे नावे व शस्त्र या कलाकाराने आपल्या हाताच्या सहाय्याने पानावर अॅक्रोलिक कलरच्या माध्यमातून रेखाटन करून साकारले आहे. याकरता या कलाकाराला दोन दिवसाचा कालावधी लागला आहे.