अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला शहर म्हटले की पैठणीचे नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येते, येवल्यातील पैठणीचे नाव, देशातच नाही तर साता समुद्रा पार पोहचले आहे. परदेशात असणारे भारतीय मायदेशात आल्यावर येवला पैठणीची मागणी करतात, हातमागावर विणलेल्या पैठणीवर या शहरातील पैठणी कारागीरांनी अनेक वेळेस आपली कला पैठणी बरोबर शेल्यावर सादर केलेली आहे. अशाच प्रकारे मयूर मेघराज यांनी पैठणीच्या शेल्यावर महाराष्ट्राचा नकाशा काढून नकाशावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा साकारायला त्यांना पंचवीस दिवस लागले आहे. तयार झालेली ही पैठणी स्वतः उपमुख्यमंत्री यांना देणार असल्याचे मयूर यांनी सांगितले.