नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या नाशिक शाखेच्या नूतन अध्यक्ष डॉ. राजश्री पाटील यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मुलगा श्री. पृथ्वीराज आणि सून सौ. सावनी यांचे कार अपघातात निधन झाले आहे. हे दोघेही अमेरिकेतील कॅलिफॉर्निया येथे राहतात. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या मर्सिडीज कारला भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच डॉ. पाटील आणि त्यांचे कुटुंबिय तातडीने अमेरिकेला रवाना झाले आहेत.