विशेष प्रतिनिधी, नाशिक
गेल्या २४ तासात नाशिक शहरात खासगी हॉस्पिटलला लक्ष्य करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. रुग्णांचा मृत्यू होणे ही दुर्देवी घटना आहे. मात्र, डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. त्यातच कोविडच्या संकटात तर डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. अशातच हल्ल्याच्या दोन घटना घडणे निषेधार्ह आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेने जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व खासगी कोविड सेंटरला २४ तास पोलिस सुरक्षा देण्यात यावी, वरिष्ठ पोलिस अधिकारी समन्वयासाठी देण्यात यावा, या दोन्ही हल्ल्यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
हे पत्र असे