विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतातील नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीसाठी वणवण भटकत असताना मुंबई चक्क बेकायदेशीररित्या लसीकरण सुरू असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनीच हा प्रकार उघडकीस आणला आहे. देशात अद्याप मॉडर्ना लसीला मान्यता नसताना तिचे लसीकरण सुरू असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
देशात लसीकरणासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेक, स्पुतनिक व सिरमच्या लसीला परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई शहराच्या आसपास मॉडर्ना कंपनीच्या लसीचे लसीकरण परदेशातील दुतावासांना कसे करण्यात येते, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. याचा खुलासा केंद्र सरकारने त्वरित करावा, अशी मागणीही मलिक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. सध्याच्या काळात देशातील लोकांना लस मिळत नाही. हा गंभीर प्रश्न असताना हे लसीकरण कसे सुरू आहे आणि या लसीकरणाला विशेष परवानगी देण्यात आली का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. दरम्यान, याप्रकरणावरुन येत्या काळात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
बघा मलिका काय म्हणताय ते (व्हिडिओ)
देशात लसीकरणासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेक, स्पुतनिक व सिरमच्या लसीला परवानगी दिली असताना मुंबई शहराच्या आसपास मॉडर्ना कंपनीच्या लसीचे लसीकरण परदेशातील दुतावासांना कसे करण्यात येते याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. pic.twitter.com/hfJmDzmC41
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 13, 2021