नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिडोरी भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील कुकुडने येथे सापळा रचत १३ लाख ९३ हजार ६०० रुपये किंमतेचे अवैध मद्य जप्त केले. या कारवाईत परराज्यातील मद्याची वाहतुक करणारा महिंद्रा बोलेरो पिकअप ताब्यात घेण्यात आला आहे. ही अवैध वाहतुक करणारा फरार आरोपी व त्याचे साथीदार यांचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात वाहनाचे मालक व इतर संशयित यांचा शोध घेणे सुरु आहे.
होळी व धुलिवंदन या सणाच्या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणात अवैधरीत्या परराज्यातील मद्याची वाहतुक होणार असल्याची गुप्त बातमी दिंडोरी भरारी पथकाचे निरीक्षक मंगेश कावळे यांना मिळाल्यानांतर सुरगाणा तालुक्यातील कुकुडने या ठिकाणी सापळा रचण्यात आला. या ठिकाणी संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम. एच. ०६ बी. जी. ४४४२ हे वाहन येताना दिसताच त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. पण चालकाने वाहन न थांबवता तो पळुन गेला. या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर वाहनाच्या चालकाने डोंगरपाडा शिवारातील जंगलामध्ये वाहन सोडून दिले. त्यानंतर तो फरार झाला. या वाहनाची तपासणी केल्यानंतर दमण, दिव व दादरानगर हवेली येथे विक्रीसाठी असलेला मुद्देमाल वाहनासह मिळून आला.
वाहनासह इतका दारुसाठा जप्त
इंपेरिअर ब्ल्यु हिस्किच्या १८० मिली क्षमतेच्या ९६० सिलबंद बाटल्या (२० बॉक्स), इंपेरिअर ब्ल्यु व्हिस्किच्या ७५० मिली क्षमतेच्या ६० सिलबंद बाटल्या (५ बॉक्स), जॉन मार्टिन व्हिस्किच्या १८० मिली क्षमतेच्या १२०० सिलबंद बाटल्या (२५ बॉक्स), किंगफिशर तीव्र बिअरचे ५०० मिली क्षमतेचे २४० सिलबंद टिन (१० बॉक्स), एक महिंद्रा बोलेरो पिकअप जिचा प्रादेशिक वाहन क्र. एम. एच. ०६ बी. जी. ४४४२.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई निरीक्षक एम. एन. कावळे, निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक एस. व्ही. देशमुख, दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार, जवान सर्वश्री. व्ही. आर. सानप, व्ही. बी. पाटिल, जी. वाय. शेवगे, एस. एम. भांगरे, डि. आर. नेमणार, पी. एम. वाईकर, व्ही. टी. कुवर, एस. डी. पोरजे यांनी केली. पुढील तपास दिंडोरी भरारी पथकाचे निरीक्षक एम. एन. कावळे हे करित आहे.