वणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाने धडक कारवाई करत वणीच्या नाशिक रोडवर हॉटेल वंदेश समोर सापळा रचून माल वाहतूक वाहनातून प्लास्टीक ड्रममधून इम्पेरियल ब्लु नावाच्या विदेशी दारूच्या २४० सिलबंद बाटल्या, १८० मिली क्षमतेच्या १९२० सिलबंद बाटल्या एक मोबाईल व १२ प्लास्टीक ड्रम असा ११ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतले असून, चार संशयित फरार आहे. दादरा नगर हवेली व दिव – दमण भागातून राज्यात अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने हा मद्यसाठा आणला जात असल्याचे समजते.