नाशिक – नाशिक महापालिका शहराच्या वाहतुक व्यवस्थेबात सातत्याने नवनवीन कार्यक्रम राबवित असते. झेब्रा कॉसिंग, फुटपाथ, सिग्नल यंत्रणा असेल अशा सर्व साधनांचा अवलंब करीत आहे.नाशिकमध्ये वाहनांची संख्या वाढते आहे. येत्या काही दिवसात पार्किंग पॉलिसी देखीलआणली जाणार आहे. मात्र नाशिककरांनी स्वत:हून वाहतुकीचे नियम पाळण्याची गरजअसल्याचे प्रतिपादन नाशिक महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी केले. नाशिक फर्स्ट व लॉर्ड इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऐकाना नाशिककर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
ट्रॅफिक पार्क येथे गुरुवार (२१जुलै) रोजी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळीलॉर्ड इंडीया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनुप देशमुख, इपीआरओसी चे जनरल मॅनेजर अरविंद पाटील, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिकमहापालिकेचे आयुक्त रमेश पवार, कॅप्रिहन्स इंडीया कंपनीचे असि. व्हाइस प्रेसिडेन्टमनोज कुमार देशमुख, मेट्रॉलॉजी विभागाचे असि कंट्रोलर राजदेरकर, जॉ. कंट्रोलरनरेंद्र सिंग, एसीपी सिताराम गायकवाड, आरटीओ प्रदिपशिंदे, नाशिक फर्स्ट चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
रमेश पवार पुढे म्हणाले की, नाशिक फर्स्ट ने हा उपक्रम अगदी वेळवर आयोजित केला आहे. शहरात सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. महापालिकेने हे खड्डे तातडीने बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात नाशिककरांना खड्डे मुक्त नाशिक दिसेल अशी मी ग्वाही देतो. नाशिकची लोकसंख्या ही काही लाखांच्या घरात आहे. या लोकसंख्येच्या तुलनेत नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी सर्व काही करु शकणार नाहीत. नागरिकांनी देखील स्वच्छता मोहीमेसारख्या उपक्रमात हातभार लावला पाहीजे.
पोलिस आयुक्त नाईकनवरे म्हणाले की, नाशिक शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरु आहे. ही वाटचाल असली नाही, तर दिसलीपाहीजे. यासाठी स्मार्टसिटीचे अधिकारी नाशिक महापालिकेचे अधिकारी, आरटीओ विभागाचेअधिकारी यांची दर बुधवारी संयुक्त बैठक आयोजित केली जाते. त्या बौठकीत वाहतुकसुरक्षेविषयीचा आढावा घेतला जातो. नाशिक शहरातून जाणाऱ्या २३ किलोमिटर हायवेवरदेखील विशेष लक्ष देण्यात येते आहे. या मार्गावर चार वाहने फिरती ठेवण्यात आलीअसून त्याच्याकडून देखील आढावा घेण्यात येतो आहे.तसेच यापुढील काळात शहरातील रस्त्यांना कलर कोडींगकरण्यात येणार आहे. त्यामुळे कलर कोडींग करणारे भारतातील पहिले शहर म्हणून ओळखलेजाईल. याबाबत पॉवर पॉइन्ट प्रेझेंन्टेशन तयार करण्यात आले असून नाशिककरांच्यासहाय्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल.
आरटीओ भगत साहेब म्हणाले की, हाउपक्रम दहा दिवस न राबवता प्रत्येक नाशिककरांने ३६५ दिवस वाहतुकीच्या नियमांचीअमंलबजावणी करणे गरजेचे आहे. लॉर्ड इंडीयाचे व्यवस्थापकीय संचालक अनुप देशमुखम्हणाले की, बाहेरच्या देशात वाहतुकीच्या नियमांचे काटोकरोर नियम पाळले जातात.नाशिककरांनाही पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी लॉर्ड इंडीयाच्या वतीने नाशिक फर्स्ट जेजे उपक्रम राबवेल यासाठी आम्ही मदत करण्यास कटीबद्ध असू अशी त्यांनी ग्वाही दिली.
या उपक्रमाबद्दल माहिती देतानानाशिक फर्स्ट चे अभय कुलकर्णी म्हणाले की, आपण ज्या शहरात रहातो त्या शहराचे आपणकाही देणं लागतो. त्यासाठी नाशिक फर्स्ट ही संस्था विविध उपक्रम राबवित असते. याउपक्रमाला प्रसासकीय पातळीवर देखील चांगला प्रतिसाद मिळतो. नाशिककरांनीनाशिककरांसाठी ही चळळ सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.
हि मोहीम ३१ जुलैपर्यंत सुरुरहाणार असून यात विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे. यामध्ये शहरातील पन्नासपेट्रोल पंपांवर वाहतुक जनजागृती करणारे बॅनर्स लावण्यात येणार आहे. तसेच दोनशेअटोरिक्षांवर पोस्टर लावण्यात येणार आहे. त्याच बरोबर शहराची वाहीनी असलेल्या सिटीलिंक बसेसवर देखील पोस्टर लावण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे शहरातील विविधसरकारी कार्यलये सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावून जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील सिनेमागृहांमध्ये जनजागृती करणाऱ्या छोट्या अवेअरनेस फिल्मदाखवण्यात येणार आहे. स्थानिक रेडीओ चॅनल्स, समाज माध्यमे यांच्यावर देखीलजनजागृती केली जाणार आहे. इलेक्ट्रीक वहानांना प्रोत्साहन मिळावे यासाठीइलेक्ट्रीक वहानांची राईड काढली जाणार आहे.
आपण जाणताच नाशिक ‘नाशिक फर्स्ट’ ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी जनजागृतीचे काम करीत आहे. या संस्थेने आजवर अनेक उपक्रम राबविले असून त्याचे आपण साक्षीदार आहात. यापुढेही सतत्याने असेच उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. या दरम्यान नाशिककरांना वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी विनंती करण्यात येणार आहे. अत्यंत वेगळी संकल्पना घेऊन हा उपक्रम राबविला जाणार असल्याने प्रत्येक नाशिककरांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन नाशिकफर्स्टच्या वतीने अभय कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश पटेल यांनी केले. गौरव धारकर यांनीही ऐका ना नाशिककर उपक्रमाची माहिती सांगितली तर देवेंद्र बापट यांनी आभार प्रदर्शन केले.