इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) लखनऊचा बीटेक अंतिम वर्षाचा विद्यार्थी अभिजित द्विवेदी याला सर्वाधिक पगाराचे पॅकेज मिळाले आहे. आयर्लंडमधील अॅमेझॉनच्या डब्लिन ऑफिसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर म्हणून काम करण्यासाठी त्यांना वार्षिक १.२ कोटी रुपये पगाराची ऑफर देण्यात आली आहे.
या ऑफरसह, प्रयागराजच्या मुलाने आयआयआयटी लखनऊमधील मागील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूच्या महामारीपूर्वीच्या तुलनेत १०० टक्के प्लेसमेंट आणि सर्वोच्च पॅकेज या संस्थेत मिळाले आहे. आयआयआयटी लखनऊ येथे या वर्षीच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सरासरी पगार पॅकेज रुपये २६ लाख प्रतिवर्ष होते. यापूर्वी एप्रिलमध्ये एनआयटी पटनाची विद्यार्थिनी आदिती तिवारी हिला १.६ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले होते.
जानेवारीमध्ये बिहारमधील आणखी एका विद्यार्थ्याने १.१० कोटी रुपयांच्या पॅकेजसह गुगलमध्ये नोकरी मिळवली होती. संप्रीती यादव फेब्रुवारीमध्ये नोकरीवर रुजू झाल्या होत्या. जुलै २०२१मध्ये, सोनीपत येथील शेतकऱ्याचा मुलगा अवनीश छिकारा याला देखील वार्षिक ६७ लाख रुपयांच्या पगाराच्या पॅकेजवर अॅमेझॉनमध्ये नोकरी मिळाली. आता अभिजीत द्विवेदी यालाही असे भक्कम पॅकेज मिळाले असल्याने तो कौतुकाचा विषय ठरला आहे.
तुम्हालाही अॅमेझॉनमध्ये काम करायचंय?
अॅमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचे सगळ्या तरुणांचे स्वप्न असते. पण तिथे काम मिळवावे कसे, याचा मार्ग दिसत नाही. अशा सर्वांना अॅमेझॉनच्या वेबसाइटवर करिअर या पर्यायामध्ये जाऊन व्हॅकन्सीविषयी माहिती मिळवावी. शिवाय तिथे इंटर्नशिपसाठीदेखील अर्ज करून सुरुवात करू शकता.