इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील अशा काही मोजक्या शैक्षणिक संस्था आहे जेथे विद्यार्थ्यांना नोकरीची थेट संधी मिळते. आयआयटी कानपूर सुद्धा त्यापैकीच एक आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी यंदा नोकऱ्यांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. २०२२-२३ साठी प्लेसमेंट ड्राइव्ह सुरू होण्यासाठी तीन महिने बाकी आहेत आणि आयआयटी कानपूरच्या २७३ विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. प्री-प्लेसमेंट ऑफर अंतर्गत, विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या विद्यार्थ्यांना सरासरी २२ लाख रुपयांच्या पॅकेजमध्ये नोकरी देऊ केली आहे.
आशादायी भारतीय तंत्रज्ञान संस्थांची (IITs) मागणी देशात आणि जगात सातत्याने वाढत आहे. आयआयटी कानपूरच्या १७२ विद्यार्थ्यांनी ही ऑफर स्वीकारली आहे. यावेळी ३५% विद्यार्थ्यांना मागील वर्षांच्या तुलनेत अधिक प्री-प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत. यासोबतच इंटर्नशिपसाठी संस्थेतील गुणवंतांनाही मोठी मागणी आहे. आतापर्यंत ३३२ विद्यार्थ्यांना देश-विदेशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी इंटर्नशिपसाठी आमंत्रित केले आहे.
विमलेशच्या प्रेमात मितालीचे बंड
कानपूर आयआयटीमध्ये दरवर्षी प्लेसमेंट, पॅकेज, इंटर्नशिपचा आलेख वाढत आहे. संस्थेने २०२१-२२ च्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सर्वाधिक पॅकेजेसचा विक्रम केला आहे. यावर्षी विद्यार्थ्याला सर्वाधिक २.३ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. त्याचबरोबर सरासरीही वाढली आहे. यावेळी कंपन्यांनी सरासरी २८.७ लाखांचे पॅकेज ऑफर केले आहे. आंतरराष्ट्रीय ऑफर्सही वाढल्या आहेत. यावर्षी ४७ विद्यार्थ्यांना परदेशातील कंपन्यांनी नोकरी दिली आहे.
सत्र २०२२-२३ साठी प्लेसमेंट ड्राइव्ह डिसेंबरपासून सुरू होईल. असे असतानाही विदेशी कंपन्यांनी येथील गुणवत्तेचा शोध सुरू केला आहे. काही कंपन्या इंटर्नशिपच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना आमिष दाखवत आहेत, तर काहींनी नोकरीच्या ऑफर दिल्या आहेत. गेल्या वर्षी, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपमध्ये जास्तीत जास्त १३ लाख रुपये प्रति महिना स्टायपेंड दिले होते. ४९ विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेजवर ठेवले आहे.
सरासरीसह सर्वोच्च पॅकेजचा विक्रम असा
वर्ष…. सर्वोच्च पॅकेज….. सरासरी पॅकेज
२०२१-२२…. २.३ कोटी…… २८.७ लाख
२०२०-२१…. १.४ कोटी….. २४.४ लाख
२०१९-२०…. १.५ कोटी….. २१.८ लाख
IIT Kanpur Students Campus Drive Opportunity