नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील प्रतिष्ठीत अशा AIIMS , IIM , IIIT , NIT , IISc & IISER,Institution of National Importance & Other Colleges या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. तुम्हाला सरकारी शिष्यवृत्ती मिळू शकते.
भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घट्कातील विद्यार्थ्यांनासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. राज्यातील १०० अनुसूचित जातीच्या /नवबौद्ध घट्कांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड्ळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
सदर योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापिठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोद्णी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापिठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे रुपये १० हजार दोन ट्प्यात अदा केले जाणार आहे.
सदर योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ≥≥ जलद दुवे ≥≥ रोजगार या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली आहे. सदर संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपुर्ण भरुन कागदपत्रासह दि १४.०८.२०२३ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य,३ चर्च पथ पुणे येथे सादर करावा. पदवी /पदव्युतर पदवी/ पदव्युतर पदविका पुर्णवेळ अभ्यासक्रसाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्याच विद्यार्थ्याना याचा लाभ मिळणार आहे. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्याचे समाज कल्याण आयुक्त श्री. ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.