गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आयआयटी बॉम्बेद्वारे पहिल्या भारतीय नॅनोइलेक्ट्रॉनिक्स वापरकर्ता कार्यक्रमाचे आयोजन

by Gautam Sancheti
ऑगस्ट 14, 2024 | 12:39 am
in संमिश्र वार्ता
0
WhatsAppImage2024 08 13at7.47.01PM1LUWA

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयआयटी बॉम्बे ने 10 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या भारतीय नॅनोइलेक्ट्रॉनिक्स वापरकर्ता कार्यक्रमाचे (आयएनयूपी) आयोजन केले होते. आयएनयूपी हा 2008 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयआयटी बॉम्बे आणि भारतीय विज्ञान संस्थेत (आयआयएस) सुरू केलेला एक पथदर्शी उपक्रम आहे आणि 2021 मध्ये आयआयटी गुवाहाटी, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर, आयआयटी मद्रास येथे त्याचा विस्तार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात देशभरातील शैक्षणिक संशोधक आणि अलीकडे स्टार्टअप कंपन्यांच्या वापरासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय-समर्थित सेमीकंडक्टर नॅनोफॅब्रिकेशन सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. भारत सेमीकंडक्टर अभियानात मदतगार म्हणून औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी देखील या सुविधा वाढवण्यात येत आहेत. सहा आयएनयूपी यजमान संस्थांनी सहआयोजित केलेल्या वापरकर्त्यांच्या मेळाव्याने कार्यक्रमाच्या व्यापक उपलब्धींचा उत्सव साजरा झाला आणि त्याच्या भविष्यातील मार्गाची रूपरेषा ठरली. या मेळाव्याने आयएनयूपी च्या स्थापनेपासून फायदा झालेल्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग व्यावसायिकांचा एक बहुविद्याशाखीय गट एकत्र आणला.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव (MeitY) आणि या आयएनयूपी वापरकर्ता मेळाव्याचे प्रमुख पाहुणे एस. कृष्णन यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले. आपल्या बीजभाषणात कृष्णन यांनी देशभरात नॅनोइलेक्ट्रॉनिक संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासाठी आयएनयूपी च्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. “आयएनयूपी ने केवळ अत्याधुनिक संशोधनाची सोय केली नाही तर एक मजबूत पायाभूत सुविधा देखील निर्माण केली आहे जी संपूर्ण भारतातील संशोधकांना नॅनोइलेक्ट्रॉनिक्समध्ये महत्त्वपूर्ण कामात सहभागी होण्यासाठी सक्षम करते. हा उपक्रम आपल्या देशाच्या तंत्रज्ञानाधारित भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे,” असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात भारत सरकारचे माजी प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते, ज्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली होती. “आयएनयूपी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील राष्ट्रीय सहयोगाचा आदर्श आहे. अशा उपक्रमांद्वारेच आपण भारतातील नवोन्मेषांच्या सीमांचा विस्तार सुरू ठेवू शकतो” याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या मेळाव्याला 350 हून अधिक सहभागींनी हजेरी लावली, ज्यात आयएनयूपी यजमान संस्थांचे प्राध्यापक, उद्योग आणि शैक्षणिक अशा दोन्ही क्षेत्रातील तज्ज्ञ, स्टार्टअप्स आणि महत्वपूर्ण सहयोगी प्रयत्न दर्शवणारे आयएनयूपी सुविधांचे सक्रिय वापरकर्ते यांचा समावेश होता. या कार्यक्रमात आयएनयूपीद्वारे संशोधनाला पाठबळ मिळाल्यामुळे कारकीर्दीत लक्षणीय प्रगती केलेल्या वापरकर्त्यांच्या यशोगाथा दाखवण्यात आल्या. “भारताच्या नॅनोइलेक्ट्रॉनिक्स/सेमीकंडक्टर गरजांसाठी प्रतिभा विकास” यावर लक्ष केंद्रित करणारे ‘मंथन सत्र: भविष्यातील आयएनयूपी’ हे संमेलनाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य होते.

आयएनयूपीची सध्याची क्रियाशीलता आणि मोठ्या भारतीय सेमीकंडक्टर/नॅनोअभियांत्रिकी परिसंस्थेचा संदर्भ लक्षात घेता आघाडीच्या तज्ज्ञ, शैक्षणिक आणि उद्योग व्यावसायिकांना एकत्र आणून आयएनयूपी च्या भवितव्यावर चर्चा करणे हा यामागचा उद्देश होता. सखोल औद्योगिक-शैक्षणिक सहयोग, स्टार्टअपसाठी अधिक शाश्वत समर्थन आणि मनुष्यबळ विकासासाठी अधिक प्रमाणित प्रशिक्षण सामग्री विकसित करण्याच्या गरजेवर तज्ज्ञांनी भर दिला. आयएनयूपी आणि त्याच्या उपक्रमांबद्दल अधिक तपशीलवार माहितीसाठी, कृपया INUP-i2i (https://inup-i2i.in/) ला भेट द्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

Next Post

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011