इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाकुंभमेळ्यात आयआयटी बाबा म्हणून प्रसिध्द झालेल्या अभय सिंग यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. या बाबाकडून गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोटरॅापिक सबटन्स (एनडीपीएस) कायाद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात या बाबाचा लाईव्ह शो दरम्यान वाद चांगलाच चर्चेचा ठरला होता. एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमा दरम्यान त्याच्यावर हल्ला झाल्याचा आरोपही या बाबाने केला होता. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाल्यामुळे बाबा चांगलाच संतापला आहे.
त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, हा खटला लढण्यासाठी काही वकिलांची, उच्च न्यायालयाची, सर्वोच्च न्यायालयाची गरज आहे मी जयपूरमधील रिद्धी सिद्धी येथील लाइटहाऊस हॉटेलमध्ये आहे, जर तुम्ही मदत करू शकत असाल तर कृपया करा. त्याचबरोबर त्याने सांगितले की, गेल्या दोन तासांपासून तपासणी सुरु आहे. पोलिस मला व्हिडिओ काढू देत नव्हते. मी रात्रभर झोपलो नाही. मला नको तुमचं सनातन, मी दुस-या देशात जाऊनही सनातन करु शकतो. आपले ज्ञानी लोक तुमच्याकडे ठेवा, पोलिस आज माझा वाढदिवस साजरा करत आहे.