नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डिझाईन क्षेत्रात कार्यरत व्यवसायिकांची राष्ट्रीय संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स (आयआयआयडी) तर्फे नाशिक मध्ये 30 ,31 जानेवारी व 1 फेब्रुवारी दरम्यान नॅटकॉन 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने कुंभ नगरी नाशिकमध्ये डिझाईन कुंभ भरणार असल्याचे प्रतिपादन परिषदेचे समन्वयक व आयआयआयडी च्या नाशिक चाप्टरचे अध्यक्ष आर्की. अतुल बोहरा यांनी दिली. त्र्यंबक रोडवरील डेमोक्रसी हॉल येथे ही परिषद होणार असून या निमित्ताने इंटिरियर डिझाईनिंग क्षेत्रात कार्यरत देश व विदेशातील १२०० हून अधिक नामांकित तज्ञ नाशिकमध्ये येणार असल्याचे त्यांनी नमूद केले .
आय आय आय डी या संस्थेची स्थापना इंटिरियर क्षेत्रात वैचारिक देवाण-घेवाण करणे तसेच नवे तंत्रज्ञान ,नवी माहिती याचे आदान प्रदान होऊन नवनिर्माण करणे यासाठी सुमारे 52 वर्षांपूर्वी करण्यात आली .आजमीतिला देशभरातील 31 प्रमुख शहरात चाप्टर कार्यरत असून सुमारे 8000 हून अधिक सदस्य संस्थेची जोडले गेले आहेत
परिषदेची थीम – कालानुरूप डिझाइन
डिझाईन ही संकल्पना अनंत काळापासून अस्तित्वात आहे. परंतु त्याचे रूप हे काळानुसार बदलत गेले आहे. या परिषदेची थीम ही कालानुरूप डिझाईन अशी आहे. कुंभ नगरी नाशिक मध्ये आयोजित ही परिषद म्हणजे डिझाईन कुंभ असून या मध्ये नवीन संकल्पना मनात ठेऊन त्यावर विचार मंथन होऊन ज्ञान अमृत प्रवाहित होईल .
परिषदेत पुढील विषयांवर चर्चासत्र
1.आरोग्य आणि उत्पादकतेसाठी डिझाइन
2.विवेकपूर्ण डिझाइन: शाश्वत आणि संसाधनचा योग्य उपयोग
3.संस्कृती जतन करणारी डिझाईन
4.भविष्यासाठी सक्षम तंत्रज्ञान पूरक डिझाइन
यांचे प्रमुख भाषण
परिषदेचे उद्घाटन 30 जानेवारी रोजी होणार असून यासाठी सौरऊर्जेमध्ये कार्य करणाऱ्या एनर्जी स्वराज फाउंडेशन चे चेतन सोळंकी व स्लोव्हनियाच्या अंजा ह्युमिजन यांचे प्रमुख भाषण होईल. याचप्रमाणे आय आय आय डी चे राष्ट्रीय अध्यक्ष सरोश वाडिया मानद सचिव शामिनी शंकर जैन, नॅटकॉन राष्ट्रीय प्रमुख जबीन झचारीस, सहसमन्वयक मनीष कुमट ,जिग्नेश मोदी, गणेश वाबळे, प्रशांत सुतारिया व सुनिता वर्गीस यांची देखील परिषदेस उपस्थिती राहणार आहे.
परिषदे दरम्यान विविध कार्यशाळा
बोहोडा मास्क मेकिंग ,टेराकोटा आर्ट ,माईंड फुल डिझाईन व लाईट फीक्चर्स यावर या कार्यशाळा होतील. परिषद यशस्वी करण्यासाठी परिषदेचे सहसमन्वयक म्हणून आर्किटेक्ट राखी टकले ,आर्किटेक्ट तरन्नुम कादरी, आर्किटेक्ट वैशाली प्रधान हे कार्यरत आहेत .तसेच आर्किटेक्ट शाल्मली गायधनी ,आर्किटेक्ट आकाश कदम , आर्किटेक्ट राकेश लोया,आर्किटेक्ट रितू शर्मा, आर्किटेक्ट अनिल राका ,आर्किटेक्ट हकीम सिन्नरवाला यांचेही सहकार्य परिषदेसाठी लाभत आहे.