नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय तरुणांना त्यांचे भविष्य काय आहे याची चिंता भेडसावत असते, पण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे राहणार्या सुयश लुनावत ने एक नवीन लक्ष्य गाठले आहे.
ॲपल तर्फे डब्ल्यूडब्ल्यूडीसी या ॲन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात येते, यावर्षी याचे आयोजन ६ जून रोजी करण्यात आले होते. यातील विजेत्यांना स्कॉलरशिप दिली जाते. ही स्कॉलरशिप फक्त उदयोन्मुख विकासकांना दिली जाते त्यामध्ये नाशिक जवळील इगतपुरी येथील २५ वर्षांचा सिव्हिल इंजिनियर सुयश लुनावत याचा समावेश आहे. त्याला कोडिंग ची आवड आहे. या आवडीमुळे त्याला आता इटलीतील नेपल्स येथील ॲपल डेव्हलपर ॲकेडमीत जाण्याची संधी मिळाली. अकादमी मध्ये लुनावत आणि त्याच्या टिमने ऐकू न येणार्या तसेच अंध व्यक्तींसाठी एक ॲप तयार केले आणि ते आयफोन आणि ॲपल वॉच च्या हेप्टिक्स बरोबर जोडले,आणि त्यामुळे ते आता चांगल्या प्रकारे संभाषण करू शकतील.
सुयश लुनावत म्हणाला की यांतून मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे तुमचे आयुष्य हे शिक्षण किंवा अभ्यासातून नियंत्रित होत नसते. केवळ तंत्रज्ञान महत्त्वाचे नाही. यामध्ये मानवता आणि स्वतंत्र कलेचा समावेश असावा लागतो. डब्ल्यूडब्ल्यूडीसी स्कॉलरशिप आणि स्विफ्ट स्टुडंट चॅलेंज विषयी माहिती म्हणजे ॲपल कडून तरुणांना जीवन बदलणारी संधी उपलब्ध करून दिली जाते. आयओएस ॲपचे अर्थशास्त्र खूपच वाढत असतांना दुसरीकडे कोडर्स साठी मोठी संधी उपलब्ध होते. याच सुवर्णसंधीचा लाभ सर्वानी घेतला पाहिजे
दि स्विफ्ट स्टुडंट चॅलेंज अंतर्गत तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीत वापरकर्त्यांना सुंदर अनुभव द्यायचा आहे. सुयश ने केलेले हे काम म्हणजे त्याच्या आजीला वाहिलेली श्रद्धांजली आहे. त्याची आठवण म्हणजे तो कशा प्रकारे पत्ते खेळून आजीच्या चेहेर्यावर हास्य निर्माण करत असे. त्याने हीच कृती म्हणजे कोडिंग ची कौशल्ये त्याने अतिशय कमी वेळेत पूर्ण करून दाखवली. “एक अनुभव निर्माण करण्यासाठी कोडिंग करुन मी एक क्रिडांगण तयार केले, ज्या माध्यमातून मी आजी जो आनंद मला द्यायची तो मी पत्त्यांच्या कलांमुळे दिला. माझे प्लेग्राऊंड म्हणजे माझ्या आजीला वाहिलेली ही श्रध्दांजली आहे,
या ॲपच्या माध्यमातून त्याने आणि त्याच्या टिमने अशी गोष्ट केली आहे ज्यामुळे आता अंध-ऐकू न येणार्या लोकांसाठी एक ॲन नावाची व्यक्ती आहे जी संभाषण करते. आता ॲन ॲप स्टोअर वर लाईव्ह आहे. खूणा आणि हेप्टिक्सच्या माध्यमातून ती संभाषण करते आणि ॲन आता अंध आणि ऐकू न येणार्या लोकांना मोर्सचा वापर करुन संभाषण करण्यास मदत करते.
ॲपलच्या डब्ल्यूडब्ल्यूडीसी कॉन्फरन्स कडून सन्मान मिळणे आणि ॲपलचे सीईओ टिम कुक यांच्या कडून शाबासकी मिळणे म्हणजे एक स्वप्नवत गोष्टच आहे. सुयशला त्याच्या या गोष्टीतून भारतीय तरुणांना हे सांगायचे आहे की तुम्ही तुमची आवड जपा आणि ती जागतिक मंचावर आणा.
Igatpuri Youth Suyash Lunawat Success story Innovative App