नाशिक – रविवारी पहाटेच्या सुमारास इगतपुरी येथे रेव्ह पार्टीवर धाड पडल्यानंतर एकूण २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये १७ पुरुष तर १२ महिलांचा समावेश होता. रविवारी सायंकाळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना सोमवारी न्यायालया समोर हजर करण्यात आले. यातील काही आरोपींना एक दिवस तर इतर आरोपींना नऊ दिवस न्यायलीयन कोठडी सुनावण्यात आली होती. ज्या आरोपींची एक दिवसाची मुदत संपली त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनवाली आहे. बंगला मालकला अटक करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली.
बघा व्हिडिओ….