नाशिक – पार्टी म्हटली की अनेकांच्या मनात प्रचंड वावड्या फुटतात,मात्र रविवारी नाशिक जिल्हा गाढ झोपेत असताना इगतपुरी येथे खुद्द पोलीस प्रमुखांनीच ड्रग्स पार्टीवर धाड टाकल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. यामुळेच सर्वार्थाने इगतपुरीला मजेशीर प्राधान्य देणाऱ्या पार्टीवीरांनी ‘पार्टी घे पण नाशिकच्या हद्दीत नको’असं आवतन घालायला सुरवात केली आहे. या धाडीमुळे तरुणाईन धसका घेतला आहे..
इगतपुरी हे पावसाळ्यात पर्यटकांना आवडणारे ठिकाण. मुंबईकरांच्या सर्वाधिक पसंतीचे, धावपळीच्या जीवनात दोन दिवस शांततेत जावे म्हणून तरुणाई मोठ्याप्रमाणात इगतपुरीच्या नावाने कूच करत पार्टी रूपी ढोल पिटत असतात, पण, शनिवारी हे ढोले फुटले अचानक पडलेल्या धाडीमुळे.
ही धाड टाकली ती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे त्यांनी या सर्वांवर पाळत कायम ठेवली. रविवारी मात्र नशेवीरांनी तत्वतः काळजी घेऊनही त्यांचा डाव फसला आणि ड्रग्सचे नशेबहाद्दर त्यांच्या जाळ्यात रंगेहात फसले. शनिवार संपून रविवारची पहाट उजडण्याच्या आत गर्ग नशेतील मुलं-मुली रंगेहात पकडली गेली.अख्खा जिल्ह्यात खळबळ उडणे साहजिक होते कारण पोलिसप्रमुख डोळ्यात तेल टाकून स्वतःच चोवीस तासासाठी गस्तप्रमुख झाले. एकूण बावीस उच्चभ्रूना अटक झाली,अशातच पार्टी मागा,पार्टी देतो पण नाशिक जिल्हा हद्दीत नको अशी दबक्या आवाजातील चर्चा रविवारी दिवसभर तरुणाईत झडत गेली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना त्यांनी हाती घेतलेल्या ‘ड्रग्स फ्री जिल्हा’ मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे.