इगतपुरी – येथील खासगी बंगल्यात १२ महिला आणि १० पुरुष हे ड्रग्ज व हुक्का पार्टी करत असल्याची जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पाटील यांनी शनिवारी पहाटे चार ते पाचच्या सुमारात सदर ठिकाणी छापा मारून सर्वांना ताब्यात घेतले आहे. यातील चार महिला या चित्रपटात अभिनय करत असल्याचे समोर आले आहे. या चार अभिनेत्रीपैकी एक बिग बॅासमध्ये स्पर्धक असलेली अभिनेत्री आहे. तर इतर मराठी व साऊथ फिल्म इंडस्ट्रिजशी संबधित आहे. मानस हॅाटलेजवळ असलेल्या स्काय ताज विला या खासगी बंगल्यावर ही पार्टी होती. या सर्वांची पोलिसांनी वैद्यकिय चाचणी केली आहे. त्यांच्याकडून कॅश व ड्रग्ज जप्त पोलीसांनी जप्त केले आहे.
या सर्व छाप्याची सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी व्हिडिओ क्लीप मधून दिली आहे….