इगतपुरी – काननवाडी गावात बिबट्याने तीन वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. गौरी गुरुनाथ खडके ही चिमुकली रात्री घराच्या दाराजवळ आईबरोबर बसलेली असतांना बिबट्याने झडप घालत हा हल्ला केला व चिमुकलीला जंगलात खेचून नेले.
त्यानंतर कुटुंबियांना बिबट्याचा पाठलाग करुन आरडाओरड केला. त्यानंतर बिबट्याने गुरतुले येथील जंगलात मुलीला सोडून दिले. या हल्ल्यात मुलीच्या शरिरावर गंभीर जखमा झाल्याने तिला घोटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण, या मुलीची प्रकृती बिघडल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. असून तिच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी मोहिम सुरु केली आहे.