नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी येथे तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. नगर परिषद धरणाकडे हे सर्व जण फिरण्यासाठी आलेले असतांना ही घटना घडली. दोघांना बुडतांना पाहून तिसरा त्यांच्या मदतीला गेला पण, तो सुध्दा पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर परिषद कर्मचारी, जनसेवा प्रतिष्ठान व स्थानिक युवकांनी धरणात शोध घेतला. त्यानंतर बुडालेल्या तिघांना बाहेर काढून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचार सुरू असतांनाच तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी वेळेवर उपचार न मिळाल्याने या तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेची वृत्त समजताच परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. हे तिघांमध्ये दोन सख्खे भाऊ आहे. त्यांना वाचवण्यासाठी तिसरा गेल्यानंतर तोही पाण्यात बुडाला.