इगतपुरी – मुंबई – नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात हिवाळा पॉईंट जवळ गव्हाने भरलेला कंटेनर घाट चढत असताना वळणावर कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर संरक्षक कठडे तोडून ३०० फूट दरीत कोसळला. चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारली. मात्र डोक्यास मार लागला असून तो जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, आपत्ती व्यवस्थापन टीम, रूट पेट्रोलिंग टीमच्यां सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमी चालकास पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र जास्त जखमी असल्याने त्यास नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.