घोटी – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘संकल्प अभियान’ इगतपुरी येथे राबविण्यात आले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या पुढाकारातून गोरगरीब व गरजू अशा शंभर आदिवासी महिलांना जीवनावश्यक घरगुती साहित्याचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि ना उघाडे हे होते. तर व्यासपीठावर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम भोसले,रामदास मालुंजकर,मा सरपंच रमेश जाधव,जेष्ठ नेते देवराम नाठे,महिला अध्यक्षा सविता पंडीत,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सत्तार मणियार,युवा नेते किरण पागेरे इ होते.
यावेळी सध्याची देशाची परिस्थिती ही आणीबाणी सदृश असताना राहुल गांधी हे देशाचे एकमेव आशास्थान आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभून लवकरच पंतप्रधान होवोत असा विश्वास गुंजाळ यांनी व्यक्त केला. तर या देशाने अनेक पंतप्रधान बघितले एवढंच काय स्व. इंदिरा गांधी यांच्यासारख्या आयर्न लेडीने देशाचं नाव जगात झळकवलं मात्र कधी त्या रडल्या नाहीत. म्हणून अशा परिस्थितीत रडका माणूस जनतेला रडवणारच त्यामुळे उच्चविद्याविभूषित असं राहुल गांधी सारखं नेतृत्व देशाला लाभावं यासाठी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष दि ना उघाडे यांनी दिल्या.
या कार्यक्रमास इगतपुरी तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खातळे,युवक काँग्रेसचे सरचिटणीस कैलास घारे,योगेश सुरुडे, अहिरे,कुणाल मोरे,किरण रायकर,संदीप भागडे,मोहन भागडे,रामचंद्र कडू,यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी इगतपुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश कौटे यांनी परिश्रम घेतले