इगतपुरी – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. पलटी घेताना कंटेनर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कारवर जाऊन धडकला. या अपघातात कारमधील जिल्हा परिषद शाळांचे ६ शिक्षक आणि शिक्षिका असल्याचे समजते. दुपारी साडेचार वाजता झालेल्या ह्या अपघातात ३ शिक्षक जागीच ठार तर ३ शिक्षक शिक्षिका गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन ३ गंभीर जखमी शिक्षिकांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. घोटी टोलनाका रुग्णवाहिकेचे २ गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान ह्या अपघातामुळे मुंढेगावजवळ मुंबईकडून येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे महामार्गावर नाशिककडून येणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. पलटी घेत घेत हा कंटेनर MH 15 EB 0797 ह्या वाहनावर गेला. त्यामुळे ह्यामधील ३ शिक्षक जागीच ठार आणि ३ शिक्षक शिक्षिका गंभीर जखमी झाल्या आहेत. हे सर्वजण इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील समनेरे भागातील शिक्षक असल्याचे समजते. शेवंता दादू रकीबे वे वय 42, गीतांजली कापडणीस – सोनवणे वय वय 42 रा. नाशिक ह्या गंभीर जखमी असून अन्य २ जखमींची आणि ठार झालेल्यांची नावे समजली नाहीत.