इगतपुरी – इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील सरपंच काशिनाथ कोरडे आमच्या भोळ्या आदिवासी बांधवांची दिशाभूल करून केविलवाणी सहानुभूती मिळविण्यासाठी धडपडत आहे त्याचाच एक भाग म्हणून ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन घरकुल मिळवून देतो ,तुम्हाला योजना देतो, तक्रारी मूळे गावचे पाणी बंद झाले आहे असे सांगून कारवाई टाळण्यासाठी इगतपुरी येथे पंचायत समिती कार्यालयात प्रशासनावर दबाव आणण्यासाठी ग्रामस्थांची दिशाभूल करून त्यांना गाड्यांची व्यवस्था करून गेले असल्याचा असा आरोप सेवानिवृत्त तहसीलदार पांडुरंग कोरडे व सामाजिक कार्यकर्ते दौलत कोरडे तसेच त्यांच्याबरोबर असणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी पांडुरंग कोरडे, दौलत कोरडे यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही स्वार्थासाठी लढत नसून गावाच्या हितासाठी लढत आहोत ,सुशिक्षित जर अशा अपहार व भ्रष्टाचार झालेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्या शिक्षणाचा व अनुभवाचा काय उपयोग .सरपंच काशिनाथ कोरडे यांच्यावर कारवाई झाली नाही तर न्यायालयीन लढा उभारला जाईल. सरपंच लोकांना सांगत असलेली पाणी योजना ही ते निवडून येण्याच्या आगोदरच आराखड्यात मंजूर करण्यात आली होती ,दशक्रिया विधी शेड हे खासदार यांचे प्रयत्नांतील असून ,भूमिगत गटारी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतील आहेत,काँक्रीट रस्ता दलित वस्ती सुधार योजनेतील असून ,शाळा दुरुस्ती सॅमसोनाईट कंपनीच्या माध्यमातून झाली आहे. लॅाकडाऊन काळात बोहडा कार्यक्रम झालेला नसतानाही त्यावर खर्च कसा केला ,वासाळी फाट्यावर असलेली पोलीस चौकी कशी गायब झाली ,आदिवासी विकास विभागाकडून प्रदर्शनासाठी आलेल्या निधीचे काय केले, सरपंच यांनी आजपर्यंत गावाला प्रदर्शन यात्रा सप्ताह यांचे जमाखर्च सुद्धा कधी दिले नाहीत हेच का यांचे पारदर्शी कारभार. उपसरपंच यांच्या घरातील व ग्रा प सदस्य ,सरपंच यांच्या मर्जीतील कार्यकर्ते यांच्याच नावाने मोठमोठ्या रकमांचे चेक का काढले याचेही उत्तर सरपंच यांनी गावाला द्यावे, प्रधानमंत्री आवास योजनेतील ड यादीत असणाऱ्या लाभार्थींना घरकुल मंजूर असल्याचे गेल्या चार वर्षांपासून सरपंच सांगत असतात व दिशाभूल करतात , सरपंच काशिनाथ कोरडे गावातील ग्रामस्थांना तक्रारदार माहिती मागतात व तक्रारी करतात म्हणून तुमची घरकुल मंजूर होत नाहीत अशी वारंवार गरीब जनतेची दिशाभूल करून सरपंचांनी केलेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणावर सामन्याची दिशाभूल करून लक्ष विचलित करून सहानुभूती मिळविण्याचे काम करतात. वास्तविक प्रधानमंत्री आवास योजनेची ड यादीची अद्याप तपासणीही पूर्ण झाली नसून ती प्रक्रियेत आहे व त्या बाबतीत आमची कोणतीही तक्रार नाही तरी सरपंच उगीचच मोघम सांगून यांच्या तक्रारी मुळे घरकुल कामे मंजूर होणार नाहीत अशी सामान्य माणसाला सांगून सहानुभूती मिळवून फसवणूक करत आहेत. वास्तविक पूर्ण जिल्हाभरात घरकुलाच्या ड यादीत कोणाचेही घरकुल मंजूर नाही याची सरपंच काशिनाथ कोरडे यांनी आगोदर माहिती घ्यावी मग गरीब जनतेची दिशाभूल थांबवावी असे कोरडे यांनी सांगितले.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी पाठवलेल्या अहवालावरूनच मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवक निलेश चव्हाण यांचे निलंबन केले आहे. तर सरपंच काशिनाथ कोरडे यांच्यावर कलम ३९ नुसार कारवाई साठी प्रस्ताव दिलेला आहे. सरपंच जर माध्यमांना सांगतात की अनियमितता झाल्यामुळे निलंबन झाले आहे अपहारामूळे नाही तर पंचायत समितीने दिलेल्या अहवालाचे वाचन करावे व मग दिशाभूल बंद करावी. ज्यांनी ज्यांनी यापूर्वी व्हिडीओ बनवून सरपंच निर्दोष असल्याचे सांगितले आहे. त्यातील काहींच्या नावाने मोठमोठ्या रकमांचे धनादेश काढलेले आहेत तेही या प्रकरणात सहभागी असल्याने तेही समाजाची दिशाभूल करतात. सरपंच काशिनाथ कोरडे यांनी ही दिशाभूल बंद करून अपहार केलेला गावचा विकास निधी भरपाई करून द्यावी अशी मागणी आमची आहे ,जोपर्यंत सरपंच काशिनाथ कोरडे याच्यावर कारवाई होऊन अपहार केलेला निधी वसूल होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील प्रसंगी न्यायालयीन लढा देऊ असा इशारा तक्रारदार कोरडे यांनी दिला.
अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेल
गावच्या निधीचा अपहार करून आम्हाला बदनाम करणाऱ्या सरपंच काशिनाथ कोरडे यांनी प्रतिक्रिया देतांना भान ठेवावे व ग्रामस्थांची दिशाभूल बंद करावी अन्यथा मी त्यांच्या विरोधात व त्यांच्या सांगण्यावरून मोघम प्रतिक्रिया देणा-यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेल याची दखल घ्यावी
पांडुरंग कोरडे, सेवा निवृत्त तहसीलदार
……
आम्हांला पूर्णपणे पाठींबा
सरपंच काशिनाथ कोरडे यांच्यावर तक्रार करणारे आम्ही सहाच नाही तर मोठया संख्येने ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थ समोर येत नाहीत पण आम्हांला पूर्णपणे पाठींबा आहे. जसजसे सत्य परिस्थिती लक्षात येईल तसे सरपंचाची बाजू घेणारेही बाजूला जातील.
दौलत कोरडे , सामाजिक कार्यकर्ते वासाळी