इगतपुरी :तालुक्यातील मौजे तळेगाव शिवारात मुंबई आग्रा महामार्गा लगत असलेले पंचतारांकीत हॉटेल विवांत रेसॉर्ट मध्ये शासन नियम धाब्यावर बसवत दोन दिवस लग्न सोहळे सुमारे दोनशे ते तीनशे लोकांच्या गर्दीत संपन्न झाले असताना सदर प्रकरण उघडकीस आल्यावर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिल्यानंतर सदर रिसॉर्ट सील करण्यात आले आहे.
याअगोदरच रिसॉर्ट व्यवस्थापनाकडून वीस हजार रूपये दंड आकारणी करून कारवाई केली होती.
मात्र शासन कारवाईला न जुमानता रिसॉर्ट मालक व चालक व्यावस्थापनेने ३० रोजी पुन्हा एक लग्न सोहळा याच ठिकाणी शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थीतीत पार पाडून शासन नियमांना केराची टोपली दाखविली .