घोटी – काँग्रेसच्या सरचिटणीस व प्रभारी प्रियांका गांधीच्या उत्तरप्रदेश सरकारने केलेल्या घटनेबाह्य अटकेचा निषेधार्थ, इगतपुरी त्र्यंबकेश्र्वर तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे,जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले,आमदार स्वीय सहाय्यक संदीप डावखर,जेष्ठ नेते महादू धांडे,सरपंच गणेश म्हसणे,भरत भागडे आदी उपस्थित होते. यावेळी उत्तरप्रदेशातील लखिमपूर खिरी येथील शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडणाऱ्याचा व योगी सरकारचाही निषेध करण्यात आला.