इगतपुरी – धावत्या रेल्वे मधील महिला प्रवाशांच्या बॅगा लुटणा-या परराज्यातील टोळीला इगतपुरी लोहमार्ग पोलिसांकडून गजाआड केले आहे. इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख रेल्वे स्थानकावर गाडी उभी असताना जून महिन्यात महिला प्रवाशांच्या पर्समधून ५८ हजारांचा ऐवज या टोळीने चोरला होता. त्यानंतर तीन महिन्यानंतर हा टोळी सापडली आहे. या चोरी प्रकरणातील ४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, संगीता अरुण दुबे (मध्यप्रदेश), सिमाकुमारी ललीतेश्वर प्रसाद (बिहार) या २३ जूनला पाटलीपुत्र एक्सप्रेसने एलटीटी कुर्ला ते सतना व पटना असा प्रवास करत होता. या प्रवासात रेल्वे पाडळी देशमुख या रेल्वे स्थानकावर थांबली. येथे चोरट्यांनी डोक्याखाली ठेवलेली लेडीज पर्समधील ५८ हजार रुपये जबरीने हिसकावुन चोरुन नेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यता आला होता. या गुन्ह्याचा तपास करतांना मिळालेल्या माहितीवरून लोहमार्ग पोलीस ठाणे गुजरात येथील दाखल गुन्ह्यात अटक आरोपी दिपक महेंद्रसिंग प्रजापती, सुखविर महेंद्र वाल्मीक, सन्नी उर्फ सोनी पुरण फुल्ला, राहुल चेनाराम यांना गुन्ह्यात अटक असताना पाडळी देशमुख जवळ पाटलीपुत्र एक्सप्रेस मध्ये रेल्वे स्टेशन दरम्यान चोरी केल्याची कबुली दिली आहे. घटनास्थळाचा डाटा प्राप्त केला असता यातील आरोपी यांनी वापरलेल्या मोबाइलचे ट्रेस झाले आहेत. कोटा रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यांना कोटा मध्यवर्ती कारागृह राजस्थान येथे भरती केले. या आरोपींना इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी कोटा राजस्थान येथुन ताब्यात घेवुन अटक केली आहे. या टोळक्याचा इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.