नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पश्चिम नाशिक इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या पथकाने बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणी एकाच्या घराची झाडाझडती घेतली असता नामशेष होणारे अत्यंत महत्त्वाच्या अशा मृत गिधाड या पक्षाचे काही अवयव जप्त केले आहे. याप्रकरणी वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संहिता विरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे. तसेच जप्त केलेले अवयव व कातडी आणि बिबट्याची जमिनीत पुरलेले हाडे हे पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेला सोमवारी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिका-यांनी दिली.