पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने ठिकठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. अशीच एक आगळीवेगळी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाचे दर्शन या पार्टीमध्ये झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातून स्पष्ट होते आहे की, गणपती आणि देवीची आरती नंतर इफ्तार पार्टीला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात लोकप्रिय झाला आहे.
मुंबईत बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. तेथील हा व्हिडिओ आहे. यासंदर्भात सरोदे यांनी म्हटले आहे की, काल आयुष्यत पहिल्यांदा इफ्तार पार्टीला गेलो… मुस्लिम समाजातील रिती रिवाज माहिती करून घ्यावेत असे अनेकदा वाटते. इफ्तार पार्टीला जाण्याचे कारण वेगळे होते… या पार्टीची सुरुवात मुस्लिम समाजातील काही लोक गणपती, दुर्गादेवी यांची पूजा करून करणार होते. तेथे जाऊन मला खुप आनंद मिळाला. बघा त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ
https://twitter.com/AsimSarode/status/1518449757248978946?s=20&t=FL9eip6yY84HOSaXndVsaw