शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रोजच्या वापरातील या गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 7, 2024 | 2:09 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 20

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सर्वसामान्याला महागाईचा तडाखा बसणार आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल,शाम्पू अशा सर्वच वस्तू महागण्याची शक्यता आहे.

जुलै- सप्टेंबर तिमाहीत ‘हाय प्रोडक्शन कॉस्ट आणि फूड इनफ्लेशन’च्या कारणाने ‘एफएमसीसी’ कंपन्यांचे मार्जिन कमी झालेले आहे. त्याचा परिणाम शहरी क्षेत्रातील विक्रीवर दिसत आहे. त्यामुळे या कंपन्या आता आपली उत्पादने महागात विकू शकतात. काही कंपन्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड’पासून ते गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिडेट, मॅरिको, आयटीसी आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शहरात घटलेल्या पदार्थांच्या विक्रीने चिंता सतावत आहे. सप्टेंबर तिमाहीत शहरी क्षेत्रात विक्री अंदाजापेक्षा कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते ‘एफएमसीसी’सेक्टर च्या एकूण विक्रीत शहरातील विक्रीचा हिस्सा ६५-६८ टक्के असतो. सप्टेंबर तिमाही दरम्यान शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगली विक्री झालेली आहे. दुसऱ्या तिमाहीत झालेला हा तोटा एक शॉर्ट टर्म झटका आहे. त्यामुळे खर्च स्थिर करून मार्जिनला वसुल केले जाईल असे ‘जीसीपीएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘सीईओ’ सुधीर सीतापती यांनी म्हटले आहे. या काळात खाद्यपदार्थांचे वाढलेले दर आणि शहरी भागात मागणीत झालेली घट हीदेखील या घसरणीची कारणे मानली जात आहेत.

शहरी क्षेत्रात ग्राहकांच्या खरेदीवर मोठा परिणाम झाला आहे. खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर प्रभाव झालेला असे ‘टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘सीईओ’ सुनील डिसुझा यांनी म्हटलेले आहे. या तिमाहीत मार्केट व्हॉल्युम ग्रोथ सुस्त राहिली आहे. अलीकडच्या तिमाहीत शहरातील ग्रोथ प्रभावित झालेली आहे, तर ग्रामीण क्षेत्रात मात्र हळूवार का होईना परंतु वाढ होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदगाव मतदारसंघातील या उमेदवाराने दिला समीर भुजबळ यांना पाठिंबा….

Next Post

अगोदर ४२ लाखाची खंडणीची मागणी नंतर ईव्हीएम मशिन हॅक करून पाडण्याची या उमेदवाराला धमकी…गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

अगोदर ४२ लाखाची खंडणीची मागणी नंतर ईव्हीएम मशिन हॅक करून पाडण्याची या उमेदवाराला धमकी…गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011