मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी क्षेत्रातील नामांकित आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करणार्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी १० फेब्रुवारीपासून बँकेने क्रेडिटकार्डच्या शुल्कात बदल केला आहे. बँकेकडून या बदलाची घोषणा करण्यात आली असून, आता क्रेडिट कार्डची विलंब शुल्क वाढविण्यात आला आहे.
किती वाढ
तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी १०० रुपयांपेक्षा कमी असेल, तर कोणतेही विलंब शुल्क लागणार नाही. १००-५०० रुपयांदरम्यान थकबाकी असेल, तर १०० रुपये विलंब शुल्क आकारले जाईल. ५०१-५००० रुपयांच्या थकबाकीवर ५०० रुपये विलंब शुल्क लागू होईल. क्रेडिट कार्डच्या १० हजार रुपयांपर्यंतच्या थकबाकीवर ७५० रुपये आणि २५ हजार रुपयांपर्यंतच्या थकबाकीवर ९०० रुपये विलंब शुल्क लागू होईल. ५० हजार रुपयांपर्यंत १००० रुपये आणि ५० हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकीवर १२०० रुपये विलंब शुल्क अदा करावे लागणार आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून रोख रक्कम काढण्यावर २० हजार रुपयांसाठी ५०० रुपये शुल्क लागू होईल. याहून अधिक रक्कम काढण्यावर २.५ टक्क्यांच्या हिशेबानुसार विलंब शुल्क लागू होईल. चेक रिटर्न आणि ऑटो डेबिट रिटर्नच्या परिस्थितीत कमीत कमी ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.