इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दुबईमध्ये पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत ४९.४ ओव्हरमध्ये ऑलआऊट २२९ धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाने फलंदाजी करत ४ विकेट्स गमावून ४६.३ ओव्हरमध्ये २३१ धावा करत विजयी सलामी दिली. या ट्रॅाफीच्या पहिल्याच सामन्यात उपकर्णधार शुबमन गिल याने शतकी खेळी नाबाद १०१ रन्स केले.
या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग केली पण, भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर ४९.४ ओव्हरमध्ये ऑलआऊट २२८ धावा केल्या. तॉहिदने ११८ बॉलमध्ये १०० रन्स केले. तर जाकेर अलीने ११४ चेंडूत ६८ धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघाच्या मोहम्मद शमी याने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने ३ तर अक्षर पटेल याने २ विकेट्स मिळवल्या. त्यानंतर भारतीय संघाने फलंदाजी केली. यावेळेस कर्णधार रोहित आणि शुबमन या सलामी जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा ४१ या वैयक्तिक धावावर बाद झाला. त्यानंतर विराटने ३८ बॉलमध्ये २२ धावा केल्या. विराटनंतर भारताने ठराविक अंतराने २ विकेट्स गमावले. श्रेयस अय्यर १५ आणि अक्षर पटेल ८ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाची ३०.१ ओव्हरमध्ये ४ आऊट १४४ अशी स्थिती झाली. त्यानंतर शुबमन गिल आणि केएल राहुल या दोघांनी डाव सावरत विजय मिळवला. शुबमनने १२९ बॉलमध्ये २ सिक्स आणि ९ फोरसह नॉट आऊट १०१ रन्स केले. तर केएलने ४७ चेंडूत २ षटकार आणि १ चौकारांसह नाबाद ४१ धावा केल्या. बांगलादेशकडून रिषाद हौसेन याने २ विकेट्क घेतल्या. तर तास्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान या दोघांनी १-१ विकेट घेतली.
भारतीय संघ प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.