इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बेन स्टोक्सच्या लढाऊ खेळीच्या जोरावर इंग्लंडने टी२० विश्वचषक २०२२च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. २०१० मध्ये विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याआधी इंग्लंडचे हे दुसरे टी-20 विश्वचषक विजेतेपद आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लंडसमोर १३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ६ चेंडू बाकी असताना इंग्लंडने ते साध्य केले. बेन स्टोक्सच्या नाबाद ५२ धावांच्या जोरावर इंग्लंडने ही धावसंख्या गाठली.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी२० विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना खेळला गेला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने इंग्लंडसमोर १३८ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या, तर बाबर आझमने ३२ धावा केल्या. इंग्लंडकडून सॅम कुरनने तीन बळी घेतले, तर आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.
त्यानंतर इंग्लंडचा संघ मैदानात उतरला. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. पण, त्यांचे फलंदाज हळूहळू बाद होत गेले. अखेर बेन स्टोक्सने १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिले. बेन स्टोक्स अप्रतिम खेळाडू ठरला. जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा हा खेळाडू स्वबळावर सामना जिंकतो, हे स्टोक्सने सिद्ध केले. इंग्लंडने १९ व्या षटकात ५ गड्यांच्या बदल्यात १३८ धावा केल्या आणि इंग्लंडने दुसऱ्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
https://twitter.com/ICC/status/1591762641805971456?s=20&t=ksN0Jn2v-eGcebrG8X0tRg
ICC T20 WolrdCup England Winner
Pakistan Defeat