इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एक काळ असा होता जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा दबदबा पाहायला मिळत होता, पण गेल्या काही वर्षात किंग कोहलीच्या बॅटला धावा मिळत नव्हत्या, मात्र ऑक्टोबर २०२२ पासून विराट कोहलीचे नशीब बदलू लागले आहे. त्यामुळेच विराट कोहलीला दीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून (ICC) पुरस्कार मिळाला आहे. विराटला ऑक्टोबर २०२२ साठी ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुष आणि महिला खेळाडूंची घोषणा केली. पुरुष गटात विराट कोहली आणि महिला गटात पाकिस्तानच्या निदा दारला महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात विराट कोहलीच्या बॅटला खूप धावा मिळाल्या. गेल्या महिन्यात विराटने चार सामन्यांत 2 अर्धशतके झळकावली, त्यात पाकिस्तानविरुद्ध खेळलेली खेळी खास होती.
विराट कोहलीने आतापर्यंत ICC क्रिकेटर ऑफ द डिकेड, ICC ODI क्रिकेटर ऑफ द डिकेड, ICC क्रिकेटर ऑफ द इयर, ICC ODI प्लेयर ऑफ द इयर, ICC टेस्ट प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकले आहेत. यातील अनेक पुरस्कार असे आहेत की विराट कोहलीने एकापेक्षा जास्त वेळा आपल्या नावावर केले आहेत.
विराट कोहलीला खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये प्रभावी कामगिरीसाठी ऑक्टोबर २०२२साठी ICC पुरूष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. ३४ वर्षीय विराटने ऑक्टोबरमध्ये ४ सामने खेळले, ज्यात २०२२ च्या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धचा महत्त्वपूर्ण सामना होता, ज्यामध्ये त्याने नाबाद 8८२धावा केल्या.
https://twitter.com/ICC/status/1589528944654811136?s=20&t=xJokywqh1W91AfOilA4bsw
ICC Declare Virat kohli Honor Today
Indian Team Cricket Sports