इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याच्या जवळ जाऊन चिडवणे इंग्लंडच्या गोलंदाजाला महागात पडले आहे. आयसीसीने या गोलंदाजाला दंड ठोठावला असून भविष्यात चुका टाळण्यासाठी इशारा दिला आहे.
इंग्लंडच्या ज्या गोलंदाजाला आयसीसीने दणका दिला आहे त्याचं नाव सॅम कुरन असून जगातील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून त्याचा नावलौकीक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बवुमा या फलंदाजाला चिडवणे त्याला महागात पडले आहे. फलंदाजाला बाद केल्यानतंर आनंदाच्या भरात त्याच्याजवळ जाणे, त्याचा चिडवणे एकेकाळी चालून जायचे. यात कधी वादही व्हायचे. मारामारी व्हायची. क्रिकेट हा जेंटलमनचा खेळ आहे, असे बोलले जाते. त्यामुळे आयसीसीने यावर नियंत्रण आणण्यासाठी आचारसंहिता तयार केली आहे. तरीही दरवर्षी अनेक क्रिकेटपटूंना आचारसंहिता भंग केल्याचा दणका बसत असतो.
भारत-पाकिस्तान, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांमध्ये तर हमखास आचारसंहिता मोडली जायची. अगदी सुरुवातीलाच्या काळापासून हे घडत होते. मात्र आता असे काही केले तर हे कृत्य करणाऱ्याच्या मॅच फीमधून १५ टक्के रक्कम कपात केली जाते. १५ टक्के ऐकायला कमी वाटत असले तरीही ही रक्कम लाखोंमध्ये असते. त्यामुळे खेळाडूंना हा एकप्रकारचा आर्थिक फटकाच असतो. आता सॅम कुरनलाही या कारवाईचा सामना करावा लागणार आहे. त्याच्या मॅच फीमधून १५ टक्के रक्कम कापून घेतली जाईल. तसेच त्याच्या खात्यावर एक डिमेरीट पॉईंट देखील जमा झाला आहे. असे चार डिमेरीट पॉईंट झाले तर त्याच्यावर काही सामन्यांसाठी बंदी येऊ शकते.
काय म्हणते आचारसंहिता
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडेल अशी कृती आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग करते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मैदानांवर खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ही आचारसंहिता निर्माण केली आहे. यात आर्थिक दंडासह डिमेरीट पॉईंटचाही सामना करावा लागतो.
काय घडले नेमके?
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. दोन्ही सामने आफ्रिकेने जिंकले आहेत. दुसऱ्या सामन्यात बवुमाने शतकी खेळी केली. आणि त्यानंतर कुरनने त्याला बाद केले. त्यामुळे आनंदाच्या भरात कुरन त्याच्या जवळ गेला आणि त्याचा चिडवायला लागला. आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग झाल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
ICC Cricket Player Strong Action Bad Behavior Stadium
Sports