इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कप स्पर्धेत भारत – पाकिस्तान सामन्यात घडलेल्या घटनेत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला आयसीसीने दोषी ठरवले आहे. त्याचप्रमाणे सामन्याच्या फीच्या ३० टक्के दंडाची कारवाई केली आहे. दरम्यान बीसीसीआयने या निर्णयावर आयसीसीकडे अपील करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने झाले. दोन्ही वेळा भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले. आता अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानबरोबर होणार आहे. त्याअगोदर ही कारवाई करण्यात आली आहे.
भारत – पाकिस्तानमध्ये पहिला सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झआला. ज्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ७ विकेटसने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने माध्यमांशी बोलतांना भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं असल्याचे विधान केले होते. याच प्रकरणावर पाकिस्तान बोर्डाने तक्रार केली होती. आता या प्रकरणात सूर्यकुमार यादववर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान बीसीसीआयने यावर अपील करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
सूर्यकुमार यादवप्रमाणेच आयसीसी बोर्डाने पाकिस्तान खेळाडू हारिस रऊफ आणि साहिबजादा फरहान यावरही कारवाई केली आहे. हरिस रऊफ याच्यावर सामन्याच्या फीच्या ३० टक्के दंडाची कारवाई केली आहे. तर साहिबजादा फरहान याला ताकीद देण्यात आली आहे. या दोघांनी दुस-या सामन्यात इशारे करत गैरवर्तन केले होते.