मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC)ने २०२० या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघ जाहिर केला आहे. अभिमानाची बाब म्हणजे तिन्ही संघांच्या कर्णधारपदाचा मान भारतीय खेळाडूंना मिळाला आहे. कसोटीचा कर्णधार विराट कोहली तर वनडे आणि टी२०च्या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, भारतीय खेळाडू आर अश्विन, रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. तर, विराट कोहली हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याला आयसीसीच्या तिन्ही संघांमध्ये स्थान देण्यात आले आहे. आजच आयसीसीने या प्रतिष्ठीत संघांची घोषणा केली आहे.
आयसीसीने सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंचा संघ तयार केला जातो. ही अत्यंत गौरवाची बाब असते. सर्वाधिक भारतीय खेळाडूंची निवड झाल्याने ती बाब भारतासाठीही अभिमानाची आहे.
बघा हे दोन्ही व्हिडिओ
https://twitter.com/ICC/status/1343180437498322944
https://twitter.com/ICC/status/1343164149396865025