मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी नोकरीच्या संधीची वाट पाहणाऱ्या किंवा बँक पीओ भर्ती २०२२ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ ग्रॅज्युएशन उत्तीर्ण उमेदवारांसाठी ६००० जागांसाठी भरती होणार आहे.
Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या एकूण ६२३४ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या PO पदांसाठी उमेदवारांची निवड IBPS PO परीक्षा २०२२ द्वारे केली जाणार आहे.
IBPS PO परीक्षा २०२२ साठी अधिसूचना जारी झाल्यानंतर अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच मंगळवार, २ ऑगस्ट २०२२पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार IBPS च्या ibps.in या अधिकृत वेबसाइटवरून IBPS PO नोंदणी करुन अर्ज भरु शकतात. अर्ज प्रक्रियेअंतर्गत, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून, उमेदवार त्यांचे IBPS PO अर्ज २०२२ सबमिट करू शकतील.
अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून ८५० रुपये शुल्क भरावे लागेल. तथापि, अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क केवळ १७५ रुपये आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०२२ आहे आणि उमेदवारांनी त्याच तारखेपर्यंत स्वतःची नोंदणी करून परीक्षा शुल्क भरून अर्ज सादर करायचा आहे.
IBPS Bank Recruitment Job Opportunity 6 Thousand Vacancies