विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारने राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे प्रशासकीय कामकाजाला गतिमानता येईल, अशी अपेक्षा सरकारला आहे.
या बदल्या पुढीलप्रमाणे
गृहनिर्माण विभागाचे सचिव एस व्ही आर श्रीनिवास यांची नियुक्ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी करण्यात आली आहे. र व का विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांची बदली मुंबईच्या बेस्ट विभागाच्या महाव्यवस्थापकपदी करण्यात आली आहे. वन विभागाचे प्रधान लचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवपदी विकास चंद्र रस्तोगी यांची बदली करण्यात आली आहे. सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक बी वेणुगोपाल रेड्डी हे आता राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव असणार आहेत. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत भांगे यांच नियुक्ती आता सचिव,सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(2) या पदावर करण्यात आली आहे.