इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या दिवाळीचा उत्सव देशभरात सुरू आहे. राजस्थानमधील जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबीही फटाके उडवताना दिसल्या. मात्र या फटाक्यांच्या आतषबाजीत टीना डाबी जखमी होण्यापासून थोडक्यात बचावल्या. त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये टीना डाबी फटाके फोडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये इतरही अनेक लोक दिसत आहेत. टीना डाबी आपल्या हाताने फटाका फोडत असल्याचे दिसून येते पण तेव्हाच अचानक टीना डाबी यांच्या चेहऱ्यावर आगीच्या ठिणग्या पडतात. या व्हिडिओमध्ये दिसते की, यापासून त्या स्वतःचा बचाव करत आहेत.
याआधी टीना डाबी जैसलमेरच्या शहीद पूनम सिंह स्टेडियमवर दिवे आणि फटाके पेटवताना दिसल्या होत्या. शहीद पूनम सिंग स्टेडियमवर सोमवारी सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम सुरू होता. या भव्य आतषबाजीच्या कार्यक्रमात लोककलाकारांनी आपल्या लोकगीतांनी सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमात सोनार किल्ल्याच्या प्रतिमेसमोर रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सर्वांनी आपल्या हातांनी दिवे उजळवले आणि रंगीबेरंगी फटाक्यांनी सर्वांची मने जिंकली.
जम्मू-काश्मीरच्या टॉपर टीना डाबी यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. त्यांचा पूर्वीचा पती अतहर आमिर खाननेही लग्न केले आहे. टीना दाबी यांनी २०१५ मध्ये UPSC परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला होता. सध्या त्यांची राजस्थानच्या जैसलमेरच्या ६५ व्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. हे पद स्वीकारण्यापूर्वीही टीना डाबी यांनी इतर अनेक महत्त्वाच्या पदांवर अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
पटाखा जलाते वक्त बाल-बाल बचीं IAS #TinaDabi pic.twitter.com/LuEYxxUi6E
— Siddharth Purohit (@sidpvishnu) October 25, 2022
IAS Tina Dabi Diwali Firecrackers Save Face Accident