इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक अत्यंत हुशार विद्यार्थ्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न असते. त्या करिता प्रचंड मेहनत घेऊन ते स्पर्धा परीक्षेत यश मिळवितात. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असताना देशाची पर्यायाने जनतेची सेवा करण्याची शपथ घेतात.
यातील काही अधिकारी खरोखरच चांगल्या प्रकारे विधायक कार्य करतात. परंतु काही अधिकारी मात्र गैर मार्गाने आणि भ्रष्टाचाराने पैसा जमा करतात, असे आजच्या काळात दिसून येते. असेच एक वरिष्ठ महिला शासकीय अधिकाऱ्यांचे प्रकरण सध्या चर्चेत आहे.
झारखंड केडरच्या IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या छाप्यापासून चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याआधीही ती अनेक गोष्टींमुळे चर्चेत आली आहे. पूजा सिंघलच्या विलासी जीवनशैलीबद्दल अधिक जाणून घेऊ या…
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या IAS अधिकारी पूजा सिंघलच्या संपत्ती बद्दल एका रिपोर्ट्सनुसार समजते की, तिची नेट वर्थ सुमारे 30 ते 50 कोटी आहे. आजकाल पूजा सिंघल चर्चेत आहे कारण रांची येथील तिच्या चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमारच्या छाप्यांमध्ये 20 कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पूजा सिंघल तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. वास्तविक, तिचे लग्न झारखंड कॅडर IAS राहुल पुरवार यांच्याशी झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यानंतर पूजा सिंघलने एका व्यावसायिक रुग्णालयाचे मालक अभिषेक झा यांच्या सोबत लग्नगाठ बांधली.
पूजा सिंघलची पोस्टिंग 16 फेब्रुवारी 2009 ते 14 जुलै 2010 पर्यंत खुंटी येथे होती. यादरम्यान तिच्यावर 18 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यामध्ये 2020 मध्ये राम विनोद सिन्हा याला अटक करण्यात आली होती, यामध्ये पूजा सिंघलचे नावही तपासादरम्यान समोर आले होते.
पूजा सिंघल या 2000 च्या बॅचची IAS अधिकारी झाली. विशेष म्हणजे वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवले होते. तरुण वयात आयएएस अधिकारी झाल्याबद्दल त्यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही नोंदवले गेले.
सध्या IAS अधिकारी पूजा सिंघल हिच्यावरील आरोपांमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा तिची कारकीर्द पूर्वीप्रमाणेच वादात अडकताना दिसत आहे.
IAS अधिकारी पूजा सिंघलच्या कार कलेक्शनमध्ये अनेक कार असून ती सरकारी कारमध्ये चालते. पण याशिवाय तिच्याकडे टोयोटा कंपनीची कार आहे.