इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य शासनाचे बदल्याचे सत्र सुरुच असून वेगवेगळ्या विभागातील पाच अधिका-यांच्या आता बदल्या करण्यात आल्या आहे. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अगोदर पाच व नंचक पाच अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. याअगोदर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची बदली जालना जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली त्यानंतर त्यांच्या जागी ओंकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली. आता ओंकार पवार यांच्या जागी डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यात
१. डॉ. अशोक करंजकर (IAS:SCS:२००९) यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. डॉ. संजय कोलते (IAS:SCS:२०१०) जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वासन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. श्री सुशील खोडवेकर (IAS:RR:२०११) सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, मुंबई यांना विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. श्री सावन कुमार (IAS:RR:२०१९) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री नमन गोयल (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहायक जिल्हाधिकारी, अटापली उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS:RR:2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्रीमती लघिमा तिवारी (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.