इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीचे सरकार आल्यानंतर अधिका-यांचे बदल्यांचे सत्र सुरुच आहे. आता ८ आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.
- श्री राधाबिनोद अरिबम शर्मा (IAS:RR:2012) सह महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई यांची महापालिका आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री एम.जे. प्रदीप चंद्रेन (IAS:RR:2012) अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग. छत्रपती संभाजी नगर यांना अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
- श्री जगदीश मिनियार (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजी नगर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
५. श्री. गोपीचंद कदम (IAS:SCS:२०१५) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, सोलापूर यांना ठाणे येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
६. श्रीमती वैदेही रानडे (IAS:SCS:२०१५) सहव्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई यांना जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
७. डॉ. अर्जुन चिखले (IAS:SCS:२०१५) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांना सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे.
८. डॉ. पंकज आशिया (IAS:RR:२०१६) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
२०२५-०३-०६ १९:०३:२३