इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थान केडरच्या सनदी अधिकारी (आयएएस) टीना डाबी आणि सनदी अधिकारी डॉ. प्रदीप गावंडे हे दोघे नुकतेच विवाहबद्ध जाले आहेत. दोघांच्या लग्नाचे फोटोही आता समोर येत आहेत. टीना डाबी यांची बहिण आणि सनदी अधिकारी रिया डाबी यांनी विवाह सोहळ्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात विशेष लोकप्रिय ठरत आहे. हा व्हिडिओ टीना डाबी यांच्या लग्नाचा आहे. यामध्ये त्यांच्या लग्नाची, मेहंदी, संगीत सोहळ्याची झलक दाखवण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये टीना डाबी या पती प्रदीप गावंडे यांच्यासोबत पांढऱ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहेत. यानंतर टीना डाबी लाल रंगाच्या लेहेंग्यात मेहंदी लावताना दिसत आहेत. त्याचवेळी टीना डाबी तिची बहीण रिया आणि मित्रांसोबत ये तेरी चांद बलियां गाण्यावर डान्स करत आहेत. हा व्हिडिओ रिया डाबी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याला जवळपास एक लाख लाईक्स मिळाले आहेत.
https://www.instagram.com/reel/CcuTPEXlrmw/?utm_source=ig_web_copy_link